Download App

राहुल गांधींची खासदारकी रद्द; महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)) आणि ठाकरे गटाने सभात्याग केला. आज देशातील लोकशाही संपुष्टात अशी टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, आज आपला देश हुकमशाहीच्या दिशेने जात आहे. आमचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. लोकशाहीच्या विरोधातील घटना आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने सभात्याग केला.

मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत.

राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेचे खासदार होते. 2004 मध्ये ते पहिल्यांदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि 2019 पर्यंत ते तिथले खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीची त्यांची पारंपारिक जागा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून गमावली, परंतु वायनाडमधून निवडणूक जिंकून त्यांची संसद सदस्यत्व कायम ठेवली.

Tags

follow us