मोठी बातमी : राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…

मोठी बातमी : राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…

Rahul Gandhi News : काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.  23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर  ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  त्यामुळे ते  लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या काही वक्तव्यांवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यातून संसदेचे  कामकाज ठप्प झाले  आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये 2019 मध्ये एका निवडणूक रॅलीत राहुल गांधींनी देशातील सर्वच चोरांची आडनावे मोदीचं का असतात असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाविरोधात गुजरात भाजचे आमदार पूर्णश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे सर्व मोदी आडनाव असणाऱ्या नागरिकांची बदनामी झाल्याचे मोदींंनी तक्रारीत म्हटले होते. तसा दवादेखील सुरत येथील न्यायालयात करण्यात आला होता.

 

 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भारतीय लोकशाही ओम शांती असे म्हणत आम्ही या निर्णयाच्या विरोधात राजकीय आणि कायदेशीर बाबीतून लढा देऊ आमचा आवाज तुम्ही दडवू शकणार नाही. अडानी आणि  मोदी यांच्यातील लिंकविषयी संसदीय चौकशी समितीची आम्ही मागणी करत होतो. आमचा आवाज दडपण्यासाठीच राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube