Rahul Narvekar : आमदार अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्लीमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली आहे. आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, आपण कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला आलो आहोत. तसेच ते म्हणाले की, आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू.
नार्वेकरांकडून दिल्लीत सॉलिसिटर जनरल यांची भेट…
या विषयी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, मी कोणत्याही दबावतंत्राला किंमत देत नाही. तसेच सभागृहाच्या बाहेर केलेल्या टीपण्णींकडे मी लक्ष देत नाही. ज्या वक्तव्यांचा आमदार अपात्रतेच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा आहे. त्याकडे तर मी मुळीच लक्ष देत नाही. असं यावेळी नार्वेकर म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, आपण कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला आलो आहोत. त्यासाठी मी दिल्लीमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली आहे. तसेच आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू.
Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील
दरम्यान आमदार अपात्रतेबाबत या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना फटकारले आहे. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फेटाळले असून येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यावर सुनावणी असून नार्वेकरांना ही शेवटची संधी असल्याचं देखील बोललं जात आहे.
त्यामुळे आज न्यायालयात काय होणार? त्याचा आमदार अपात्रतेच्या बैठकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार दोन्ही गटांकडून करण्यात आली आहेत. या प्रकरणात आता कोर्टानेच निर्देश द्यावेत यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू तर शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.