‘शिवराय अन् रामदासांच्या नात्याचा पुरावा उपलब्ध नाही’; न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सुळेंनी सुनावलं
Supriya Sule On Dharmendra Pradhan : भाजपचे मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharamendra Pradhan) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलंयं. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला सुनावलं आहे. सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला देत शिवराय आणि रामदास यांच्यातील गुरुशिष्याच्या नात्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात सुळे यांनी फेसबुकवर पोस्टच शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या, “मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार…’तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’
बच्चू कडूंचा ताफा अयोध्येत अडवला, पोलिसांनी सभेलाही नाकारली परवानगी, मग चौक़ातच ठोकलं भाषण
असे असताना भाजपाचे नेते वारंवार अशी दिशाभूल करणारी निखालस खोटी विधाने करुन नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुर्वीही भाजपाच्या नेत्यांनी या पद्धतीची विधाने करुन शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या विधानाचा निषेध. भाजपाने याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Israel Hamas War : युद्धाचे चटके! साडेसात हजार बळी; हल्ल्यांनी गाझाची चाळण
दरम्यान, गुजरातच्या शालेय शिक्षण विभागाने नर्मदा येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित केलेल्या या कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रधान म्हणाले, समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते. शिवाजी बनवण्याची फॅक्टरी असलेले सर्व समर्थ गुरू इथे बसले आहेत. प्रधान यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.
Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम
धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले की, हे लोक जाणीवपूर्वक आणि सातत्याने असा वाद सुरू ठेवतात. बाबासाहेब पुरंदेर यांनी सर्वात् आदी असा विषय मांडला होता. परंतु, शेवटी त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आणि मान्य केलं की, रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते.
याआधीही भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांची तुलना केल्याचं पाहायला मिळालं होतं. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं, पण शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले’, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले होते. त्यावरुन राज्यात वादंग पेटलं आहे. आता पुन्हा एकदा भाजपचे मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी वादग्रस्त विधान केल्याने वादंग पेटणार असल्याची शक्यता आहे.