बच्चू कडूंचा ताफा अयोध्येत अडवला, पोलिसांनी सभेलाही नाकारली परवानगी, मग चौक़ातच ठोकलं भाषण
Bachchu Kadu Ayodhya Tour : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये कडू यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्री प्रभू रामचंद्राला साकडं घालण्यासाठी गेलेल्या कडू यांच्या ताफ्याला पोलिसांनी अडवलं. त्यांच्या सभेलाही पोलिसांनी परवनागी नाकारली आहे.
Maratha Reservation : ‘जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं..,’; जरांगे पाटलांनी थेट सांगून टाकलं
बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा आक्रमक झाले. त्यांना मेरा खून, मेरा देश अभियान सुरू केलं. त्याचाच भाग म्हणून ते अयोध्येला गेले. येथे ते प्रभू रामाचे दर्शन घेतील आणि रामचंद्राला कापूस, वाटाणा, सोयाबीन, ऊस आणि धान अर्पण करतील. दरम्यान, पोलिसांनी त्याचा ताफा अवडला. आमदार बच्चू कडू यांच्यासह 100 हून अधिक वाहनांचा ताफा अयोध्येत पोहोचला होता. मात्र, पोलिसांनी केवळ पाच वाहनं घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळं बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी अयोध्येतील लता मंगेशकर चौकात माईकवर छोटेखानी भाषण केले.
ताफा अड़वल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधाला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रक्त आणि पाणी एक केलं ते शेतकरी सुखी नाहीत. बिसलरीला भाव आहे पण येथील शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळाले पाहिजे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या भल्यासाठी मी अयोध्येला आलो आहे. प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी आलो असतानाही आम्हाला थांबवण्यात आले हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी अडवायचं कारण आम्हाला माहिती नाही. आमचा इतका धसका का घेतला? असं कडू म्हणाले.
देशातील ६५ टक्के लोकसंख्या शेतकरी आणि शेतमजूर आहे. शेतकऱ्यांचे समाधान करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. देशात 75 वा अमृत महोत्सव साजरा होत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष दिले गेले नाही. देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक समाज आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. त्यामुळे जातीपात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.