Weather update : देशाच्या काही भागात थंडीची लाट पसरली आहे. त्याचवेळी काही भागात पाऊसही झाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील आणि राज्यातील हवामानात बदल (Weather Update) होणार आहे. आज महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
IMD ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. पुढील काही दिवस काश्मीर खोऱ्यातही पावसाची शक्यता आहे. 18 ते 22 तारखेपर्यंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंदीगड, लडाखमध्ये पावसाची शक्यता IMDने वर्तवली आहे.
‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा स्थगित, राहुल गांधी तातडीने वायनाडला रवाना
पुढील 24 तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होईल. हरियाणा आणि पंजाबमध्ये खूप थंडी आहे. हिमाचल प्रदेशात यावेळी फारशी बर्फवृष्टी झाली नसल्यामुळे दोन्ही राज्यात थंडी वाढत आहे. हवामान खात्याने हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये धुक्याचा इशारा दिला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
Horoscope Today: आज ‘मेष’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
19 फेब्रुवारीपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. IMD ने हिमाचल प्रदेशात 19 आणि 20 फेब्रुवारीला मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.
क्रिकेट कोचचे लज्जास्पद कृत्य, मद्यपान करतानाचे व्हिडिओ व्हायरल