Raj Thackeray On Devendra Fadnavis : पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link) वरील दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले. त्यानंतर सभागृहातील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकवेळा मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका ? असे फडणवीस म्हणाले होते. त्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार सुनावले आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी अंतिम टप्प्यात; मसुद्यासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त
मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक, राम मंदिरातील चोरीवरून मुख्यमंत्री फडणवीस, भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेचे भाषण बघितले. मिसिंग लिंकबाबत राजकारण करू नका ? असे ते बोलले आहेत. त्याच्यावर बोललं की राजकारण म्हणता. इतकी वर्ष आपण काय करत होतात. दुसऱ्यांचे सरकार होती. तेव्हा आंदोलने झाली. तेव्हा राजकारण नव्हते. स्वतःच्या अंगावर आल्यावर ते विरोधकांचे राजकारण म्हणता. काय म्हणतात ? एकवेळा मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे व्वा ! लोक मिसिंग लिंकवर बोलत आहेत. महाराष्ट्राचा कुठे अपमान करतात ?
केंद्र सरकारच्या गोष्टीबद्दल बोलली की तुम्ही देशविरोधी आहेत. केंद्र सरकारची कामे आहेत. त्याचा देशाचा काय संबंध आहे. आता मिसिंग लिंकवर बोलले तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला ? लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का ? इतके दिवस विरोधकांना मोबाइलवरून शिव्या घालत होते. ठेवलेले टीम काम करत होती. आता अंगलट आले आहे. दाम दुप्पट वेगाने अंगावर आले आहे. आता त्याचा त्रास सुरू झाला आहे. विरोधकांना शिव्या घालणे, वाईट बोलले जात होते. त्यासाठी ठेवलेली टीम होती. आता तुमच्या अंगावर आल्यावर महाराष्ट्राचा अपमान आहे, यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान असे राज ठाकरे म्हणाले.
तुकाराम मुंढेच्या आदेशाला केराची टोपली, अभिनेता अरबाज शेखने समोर आणलं रुग्णालयाच वास्तव
राम मंदिरातील चोरीबद्दल बोलले तर धर्माचा अपमान म्हणता. चोरी आहे ना ती यात धर्म कुठून आला असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. मंदिराबद्दल आम्हाला अस्था आहे. प्रत्येक हिंदुला अस्था आहे. तिथे १४०० कोटी रुपये चोरले जातात. राम मंदिरात दानपेटीत टाकले, श्रद्धेने मंदिरासाठी दिलेल्या पैशाची चोरी झाली आहे. त्याबद्दल बोलायचे नाही. होसबळे म्हणाले, धर्मविरोधी लोक ते पसरवत आहे. आम्ही धर्मविरोधी आहे. हा देश धर्मविरोधी आहे का ? श्रद्धांनी दिलेले चोरी होते. हे सांगणारे पहिले कोण होते ? भाजपचा खासदार पहिल्यांदा चोरीबद्दल बोलला. तिथे ट्रस्टी कोण आहेत. पंधरा ट्रस्टी आहेत. बारा केंद्र सरकार नेमते आहे. बारा जण आरएसएस, विश्व हिंदू परिषद, भाजपशी संबंधित आहेत. चौदाशे कोटींचा चोरीचा आकडा आहे. मुळात किती चोरी झाली आपल्याला माहिती नाही. दुसऱ्यांचे सरकार असते आणि राम मंदिरात चोरी झाली असती तर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदने काय केले असते.
मोर्चे काढले असते, त्यातून राजकारण झाले असते, असे ठाकरे म्हणाले.
