Download App

Raj Thackeray : कुठेतरी आपले चुकतेय ? ठाकरेंनी डिजेवरून फटकारले

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यात गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठा जल्लोषात साजरा झाला. पण काही ठिकाणी गालबोटही लागले आहेत. राज्यातील काही भागात डिजे, डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा पाळण्यात आली नाही. कर्कश आवाजामुळे तरुणांचे ह्दय बंद पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवले आहे. मिरवणुकीच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजामुळे ह्दय बंद पडणे, मृत्यू येणे, कायमचे बहिरेपणा येणे, लेझर लाइटमध्ये दृष्टी जाणे असे प्रकार होत आहे. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी आपल्या ‘एक्स’वर एक सविस्तर लिहिले आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. तो पार पडावा यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केले ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू.

आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की, असा फटकाही विरोधकांना राज ठाकरेंनी मारलाय. परंतु उत्सवातील गालबोटावरून राज ठाकरे यांनी सुनावले आहे.

या उत्सवात दहा दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणे आणि मृत्यू येणे, कायमचे बहिरेपणा येणे, गेली काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणे हे प्रकार वाढले आहेत. यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोके निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४, २४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवणशक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.


मालगाडी घसरली; कोकणरेल्वे रखडल्या; स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितले म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचे कारण नाही. पण कुठेतरी आपले चुकतेय याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

जेव्हा त्याचे सार्वजनिक स्वरूप येते तेव्हा त्यातल्यावर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतेय ते वेळीच थांबवले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांची आहे.

‘दादा आलायं’; ‘कचऱ्याची गाडी येत नाही’ म्हणणाऱ्या महिलेला दादांचं खास शैलीत उत्तर

उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात पारंपरिक ढोलताशा पथके, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोकही येतील. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी. हिंदू सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करताना जर काही चुकीचे आढळले तर आम्ही पुढाकार घेऊ हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचे नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us