मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. वास्तव मे ट्रूथ या यू-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) युतीबाबत भाष्य केले आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी अनेकादा दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. मात्र, एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास दोन्ही ठाकरेंनीही कायम टाळाटाळ केली. मात्र, यावर आज राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. राज यांच्या या प्रस्तावावर आता उद्धव ठाकरे नेकमी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Raj Thackeray On UBT Alliance )
Video : अखेर सपकाळांच्या इनबॉक्समध्ये ‘तो’ ई-मेल आलाच; थोपटेंनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला
मुलाखतीत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्स सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
हे ठरवणारे राज ठाकरे कोण?, आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं म्हणत बच्चू कडू भडकले
सर्व मराठी माणसांनी एकत्र येत एकच पक्ष काढावा
परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.
मराठी-हिंदी वादावर प्रश्न करताच अजित पवार संतापले; राज ठाकरेंच नाव न घेता लगावला टोला
बाळासाहेब सोडून मी….शिंदेंच्या बंडावर काय म्हणाले राज ठाकरे?
मुलाखतीदरम्यान राज ठाकरेंनी यांनी एकनाथ शिंदेंना मी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत नाही असा टोलादेखील लगावला. ते म्हणाले की, शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. शिंदेंनी केलेलं बंड मलाही करणं शक्य होतं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. पण, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता असे राज यांनी म्हटले आहे.