MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री

 Ameya Khopkar Jitendra Awhad Tweeter War : राज्यात एकीकडे भाजप-सेनेत वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि मसनेमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात सकाळपासून ट्विटर वॉर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दादरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून […]

Letsupp Image (10)

Letsupp Image (10)

 Ameya Khopkar Jitendra Awhad Tweeter War : राज्यात एकीकडे भाजप-सेनेत वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि मसनेमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात सकाळपासून ट्विटर वॉर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दादरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले होते. त्यावर आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा चिमटा काढला होता. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. या वादात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नाग आणि कोंबड्यांची उपमा दिली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी किती विकोपाला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खोपकरांकडून आव्हाडांना नागाची उपमा
आव्हाडांच्या जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर खोपकरांनी पलटवार करत आव्हाडांना नागाची उपमा देत लक्ष्य केले आहे. आव्हाडांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये खोपकरांनी “जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”, असे म्हणत आव्हाडांना डिवचलं आहे.

नागाच्या  उपमेला कोंबडीने उत्तर

दरम्यान, खोपकरांच्या या ट्वीटवर आव्हाडांनी प्रत्युत्तर देत खोचक ट्विट केले आहे. यात त्यांनी केवळ खोपकरांना नव्हे तर, राज ठाकरेंनादेखील लक्ष्य केले आहे. ट्विट करताना आव्हाडांनी “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असे प्रत्युत्तर दिले आहे.

Exit mobile version