Ram Naik Resigns: माजी केंद्रीय मंत्री राम नाईक (Ram Naik) यांनी राज्याच्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या (Fisheries Development Policy Committee) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाईक हे प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याचे सांगण्यात आले. नाईक यांनी आपला राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सादर केला.
Video : बॉलिवूड खूप वाईट, ही फेक इंडस्ट्री….; इरफान खानचा लेक ओक्साबोक्सी रडला, व्हिडिओ व्हायरल…
महाराष्ट्राचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्षपद राम नाईक यांना देण्यात आल होतं. मात्र, राम नाईक यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाईक यांनी आपल्या राजीनामा पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, राम नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी केंद्रात मंत्री आणि नंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद भूषवलं आहे. जानेवारी २०२५ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने नाईक यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
“देशाला जे वाटतं तसंच घडणार”, PM मोदींचं नाव घेत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला रोखठोक इशारा
राम नाईक यांनी समितीसमोर मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच एप्रिलमध्ये याबाबतचा निर्णय घेतला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम नाईक यांना संदेश पाठवला होती, जर तुमची तब्येत ठीक नसेल तर राजीनामा घेऊन येऊ नका, मी माझा प्रतिनिधी पाठवतो. त्यानुसार आज सरकारच्या वतीने आलेल्या प्रतिनिधीकडे राम नाईक यांनी राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.