Video : बॉलिवूड खूप वाईट, ही फेक इंडस्ट्री….; इरफान खानचा लेक ओक्साबोक्सी रडला, व्हिडिओ व्हायरल…

Video : बॉलिवूड खूप वाईट, ही फेक इंडस्ट्री….; इरफान खानचा लेक ओक्साबोक्सी रडला, व्हिडिओ व्हायरल…

Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे. चाहत्यांचा त्याला खूप पाठिंबा मिळतोय. दरम्यान, आता बाबिलने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये बाबिल हा ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. इतकचं नाहीतर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर (Bollywood industry) नाराजी व्यक्त केली. तसेच काही कलाकारांची नावं घेत थेट आरोप देखील केले.

“देशाला जे वाटतं तसंच घडणार”, PM मोदींचं नाव घेत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला रोखठोक इशारा 

व्हिडिओमध्ये बाबिल खान अस्वस्थ दिसत दिसला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू असल्याही दिसले होते. पण बाबिलने नंतर आपला व्हिडिओ इंस्टाग्राम फीडवरून डिलीट केला आणि इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट केले. त्यानंतर हा व्हिडिओ रेडीटवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडविषयी नाराजी व्यक्त करताना तो म्हणतो, बॉलिवूड खूप वाईट आहे, बॉलीवूड खूप रूढ आहे, ही फेक इंडस्ट्री आहे, असं तो म्हणतो. त्यानंतर तो अनेक कलाकारांची नावे घेतो आणि नंतर ढसाढसा रडू लागतो.

another part of the story babil had put
byu/Anxious_Scratch2449 inBollyBlindsNGossip

व्हिडिओमध्ये घेतली कलाकारांची नावे

बाबिल व्हिडिओत म्हणतो, मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी अरिजित सिंगसारखे बरेच लोक आहेत, बॉलीवूड खूपच वाईट आहे. बॉलीवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे, ज्याचा मी देखील एक भाग आहे. पुढं तो म्हणतो, बॉलीवूड ही इंडस्ट्री खोटी आहे. काहींची अशी इच्छा आहे की बॉलीवूड चांगलं व्हावं… माझ्याकडे तुम्हाला दाखवायला खूप काही आहे, असं बोलू बाबिल जोरजोरात रडताना दिसतोय.

मी गावी आलो की इकडचं टेम्परेचर कमी होतं, अन् मुंबईत वाढतं…; उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला 

चाहत्यांना बाबिलची चिंता

बाबालिचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना बाबिलची चिंता वाटू लागली आहे. एका युजर्सने लिहिलं, हे खरोखरच दुःखद आहे. बाबिल खूप काही सहन करत आहे. तर आणखी दुसऱ्याने लिहिले, काहीतरी घडलंय, तो अतिशय स्पर्धात्मक वातावरणात वडिलांशिवाय असुरक्षित आहे. मला आशा आहे की त्याला मदत मिळेल, अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेतच.

दरम्यान, बाबिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर बाबिलने २०२२ मध्ये ‘काला’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. या वर्षी त्याचा ‘लॉगआउट’ हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube