गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार

ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हा दरोडा रात्री पडल्याचे सांगण्यात येते आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश केला. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. कार्यालयातील महागड्या वस्तू पसार केल्या. यामध्ये टीव्ही, एसी चा समावेश आहे. जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच […]

नितेश राणेंनंतर सदावर्तेंकडूनही ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी

Gunratan Sadavarte

ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हा दरोडा रात्री पडल्याचे सांगण्यात येते आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश केला. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. कार्यालयातील महागड्या वस्तू पसार केल्या. यामध्ये टीव्ही, एसी चा समावेश आहे. जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे की ही चोरी डायमंड गँगने केली आहे. ही गॅंग कोविड काळात बंद पडलेले ऑफिस लक्ष करता आणि तेथे चोरी करून महागड्या वस्तू लंपास करतात आणि नंतर त्यावस्तू भंगारात नेहून विकतात.

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम 

याप्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणी चौकशी करत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली. पोलिसांचे म्हणणे आहे की डायमंड गॅंग अशी कोणतीही गॅंग शहरात सक्रिय नाही. गुणरत्ने यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे पोलीस म्हणतात.

 

Exit mobile version