Download App

दाढी दिसली, नाव विचारलं… चेतन सिंगने सय्यद सैफुल्लाला कसं मारलं? सहप्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने घडवून आणलेल्या हत्यांकांडातील चौथ्या मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सय्यद सैफुल्ला (43, रा. हैदराबाद) असं चौथ्या मृत व्यक्तीचे आहे. इतर तीन मृतांची ओळख यापूर्वीच पटली होती. सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीना (57, रा, सवाई माधोपूर, राजस्थान), असगर अब्बास अली (48, रा. मधुबनी, बिहार) अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरवाला (64, रा. नालासोपारा, महाराष्ट्र) अशी अन्य तिघांची नावं आहेत. (Nampally MLA Jaffar Hussain Mehraj alleged that Sayyad Saifullah was asked his name before being killed)

पश्चिम रेल्वेचे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन सिंह मानसिक तणावात होता. याच तणावात तो स्वतःवरील नियंत्रण घालवून बसला अन् त्याने दिसले त्याला गोळ्या घातल्या. मात्र आता या घटनेतील मृत सहप्रवासी असलेल्या सय्यद सैफुल्लासोबत प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी मोठा दावा केला आहे. सैफुल्लाची दाढी दिसताच त्याला चेतन सिंह याने त्याला नाव विचारले. त्यानंतर गण पॉईंटवर त्याला पॅन्ट्री कारमध्ये नेले आणि गोळ्या घातल्या, असा दावा एका सहप्रवाशाने केला आहे.

नूहच्या हिंसाचारग्रस्त भागात कर्फ्यू, 6 जिल्ह्यांत तणावपूर्ण स्थिती, पोलिसांची करडी नजर

मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्ला अजमेर शरीफ दर्ग्यात गेला होता आणि तो मुंबईमार्गे घरी जात होता. हैदराबादच्या नामपल्ली भागातील बाजारघाट येथील तो रहिवासी होता. त्याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते आणि तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा सदस्य होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि 6 वर्षे, 2 वर्षे आणि 6 महिने वयाच्या 3 मुली असा परिवार आहे. सैफुल्लासोबत त्याच्या दुकानाच्या गाळ्याचा मालक मालक जफर खान (76) हा आणि त्याचे काही नातेवाईक होते.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर खानच्या नातेवाईकांनी सांगितले की, खान आणि सैफुल्ला त्यांच्या बर्थवर बसले होते. जेव्हा सिंह B2 कोचमध्ये घुसले आणि सैफुल्लाला त्यांचे नाव विचारले. सैफुल्लाने त्याचे नाव सांगताच चेतन सिंहने गण पॉईंटवर त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले. खान यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर सिंग यांनी त्यांच्याकडेही बंदूक दाखवली. त्यानंतर सैफुल्लाला पँट्री कारमध्ये नेण्यात आले, तिथे त्याला गोळ्या घातल्या गेल्या.

दरम्यान, मंगळवारी एका ट्विटमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पीडितेची ओळख सैफुल्लाह अशी केली आहे. नामपल्लीमधील बाजारघाट येथील रहिवासी होता. त्यांच्या पश्चात 3 मुली आहेत, सर्वात लहान फक्त 6 महिन्यांची आहे. AIMIM नामपल्लीचे आमदार… गेल्या काही तासांपासून कुटुंबासोबत आहेत आणि मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं.

Mumbai Train Firing : …म्हणून कॉन्टेबल चेतनने गोळी झाडली? महत्त्वाची अपडेट समोर

तर हैदराबादच्या नामपल्लीचे आमदार जाफर हुसेन मेहराज यांनीही आरोप केला आहे की, सैफुल्लाला मारण्यापूर्वी त्याचे नाव विचारण्यात आले होते. इतर प्रवासी होते. त्याच्यासोबत खानही जफर खान प्रवास करत होता. पण इतर कोणाला काही झाले नाही, केवळ दाढी असलेल्या सैफुल्लाला त्याच्या धर्मावरून ओळखून मारण्यात आले. हत्येपूर्वी नावे विचारण्यात आली होती, या दाव्याला दुजोरा देण्यासाठी आमच्याकडे जफर खान यांची साक्ष आहे.

यावेळी सैफुल्लाचे काका मोहम्मद वाजिद पाशा म्हणाले की, कुटुंबाने आपला एकमेव कमावणारा माणूस गमावला आहे. हे एक दहशतवादी कृत्य आहे. त्याचे नाव विचारल्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. प्रथमतः अशी चूक का झाली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. याशिवाय कुटुंबासाठी 5 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही पाशा यांनी केली.

असगर अब्बास अलीच्या कुटुंबियांनीही केली आर्थिक नुकसान भरपाईची मागणी :

मिळालेल्या माहितीनुसार असगर अब्बास अलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी असगर अब्बास अलीच्या पत्नीला आर्थिक नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे.

बिहारमधील स्थलांतरित कामगारांना मदत करणाऱ्या रिलायबल फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद आसिफ शेख यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलतान सांगितले की, “अब्बास अली यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि पाच मुले आहेत. नोकरीच्या शोधात तो मुंबईला निघाला होता. त्याच्या पाच मुलांपैकी चार मुली आहेत. आता ते कसे जगणार आहेत? या कुटुंबाला रेल्वेकडून 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाई मिळाली आहे. पण हे किती दिवस पुरेल? कुटुंबाकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. ज्याने गोळीबार केला तो आरपीएफ अधिकारी, सरकारी नोकर होता. त्यामुळे केंद्र सरकारने आर्थिक भरपाई द्यावी, अशी कुटुंबाची मागणी आहे. शिवाय, कुटुंबाला सरकारने नोकरी दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Tags

follow us