Video : फडणवीसांकडून ‘शिदोरी’ चा संदर्भ; संभाजी भिंडेवरून विधानसभेत घमासान

Devendra Fadanvis On Sambhaji Bhide Controversy : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भिडेंच्या मुद्द्यावरून आज (दि. 2) विधानसभेत जोरदार घमासान पाहण्यास मिळाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले यात त्यांनी ‘शिदोरी’ संदर्भ दिला. Nitin Desai death […]

Sambhaji Bhide Sambhaji Brigade

Sambhaji Bhide Sambhaji Brigade

Devendra Fadanvis On Sambhaji Bhide Controversy : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भिडेंच्या मुद्द्यावरून आज (दि. 2) विधानसभेत जोरदार घमासान पाहण्यास मिळाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले यात त्यांनी ‘शिदोरी’ संदर्भ दिला.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई

भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात असून, महापुरूषांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असे फडणवीस म्हणाले. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांशी बहुजन समाजाला जोडतात. तरीही त्यांना महापुरुषांवर असं वक्तव्य करण्याचा कुणीच अधिकार दिलेला नाही. तसा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे असं करणाऱ्यांवर कारवाई होईल असे फडणवीस म्हणाले.

दाढी दिसली, नाव विचारलं… चेतन सिंगने सय्यद सैफुल्लाला कसं मारलं? सहप्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव

अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मक्काअंतर्गत ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात. त्यांचं नाव गुरुजी आहे. त्यांना अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याचेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.

वडेट्टीवारांनाच विरोधी पक्षनेता का केलं? बाळासाहेब थोरातांनी खरं काय सांगूनच टाकलं

त्याचवेळी सावरकरांवर आक्षेपार्ह विधान केलं जात आहे. काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’ म्हणतं की सावरकर माफीवीर, समलैंगिक होते. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल केला जाईल असेदेखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी कारवाई करीन असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version