Download App

सनातन धर्म नसता तर आव्हाड जित्तुद्दीन झाले असते; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गट संतापला…

Sanjay Nirupam On Jitendra Awhad : जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sanjay Nirupam On Jitendra Awhad : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही सनातन धर्माबाबत (Sanatan Dharma) वादग्रस्त विधान केलं. सनातन धर्माने भारताचे वाटोळं केलंय. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. सनातन धर्माने आमच्या शिवरायांना (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक नाकारला, असं विधान आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून बाहेर काढलं.. 

जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज ‘जित्तुद्दीन’ झाले असते, असं संजय निरुपम म्हणाले.

संजय निरुपम यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्माची बदनामी करत आहे. ते अनेक खोट्या गोष्टी सांगत आहे. जर सनातन धर्म नसता तर ते आतापर्यंत जित्तुद्दीन झाले असते. सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली आहे. जर सनातन धर्म नसता तर हा देश खूप पूर्वी सौदी अरेबिया झाला असता. अशा धर्माला ‘दहशतवादी’ म्हणणे म्हणजे कृतघ्नता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांना सनातनच्या सावलीत आश्रय मिळाला होता, असं निरुपम म्हणाले.

“माझा तो राग लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता”, ‘त्या’ व्हिडिओवर बोर्डीकरांचं स्पष्टीकरण, रोहित पवारांनाही उत्तर 

नितेश राणे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असं राणे म्हणाले.

पुढं त्यांनी लिहिलं, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका, राणे म्हणाले.

 

 

 

 

 

follow us