मोठी बातमी! मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून बाहेर काढलं..

मोठी बातमी! मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून बाहेर काढलं..

Manoj Jarange lift accident : बीडमधून (Beed) मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अपघातातून मनोज जरांगे सुखरुप बचावल्याची माहिती आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

“माझा तो राग लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता”, ‘त्या’ व्हिडिओवर बोर्डीकरांचं स्पष्टीकरण, रोहित पवारांनाही उत्तर 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये शिवाजीराव मेडिकल केअर नावाचं एक मोठ रुग्णालय आहे. इथे जरांगे एका रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. संबंधित रुग्ण हा दुसऱ्या मजल्यावर दाखल होता. त्याला भेटण्यासाठी जरांगे दुसऱ्या मजल्यावर जात होते. पण पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडली आणि थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारीही लिफ्टमध्ये होते. लिफ्ट जमिनीवर कोसळल्यानंतर मोठी धावपळ उडाली होती.

अर्धवट वकील हेतुपरस्पर बदनामी करतोय, राजीनामा मागणारा तू कोण?, रामदास कदमांचा परबांवर हल्लाबोल 

लिफ्ट कोसळल्यानंतर लिफ्टचे दरवाजेही उघडत नव्हते. त्यामुळे लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करतात. त्यामुळं त्यांची तब्येत सारखी बिघडत असते. आताही जरागेंनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा घेऊन जरांगे पाटील मुंबईत धडकणार आहेत. असं असतांनाच त्यांच्यासोबत अशी दुर्घघटना घडल्याने त्यांचे मराठा बांधव त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. पण सुदैवाने जरांगे या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube