अर्धवट वकील हेतुपरस्पर बदनामी करतोय, राजीनामा मागणारा तू कोण?, रामदास कदमांचा परबांवर हल्लाबोल

Ramdas Kadam on Anil Parab: सावली बार प्रकरणावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच आज कदम यांनी परब यांच्यावर जोरदार शब्दात पलटवार केला. अर्धवट वकील हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत, त्यांच्याकडून सभागृहात मांडले गेलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं कदम म्हणाले. तसेच राजीनामा मागणारा तू कोण?, असा सवालही त्यांनी केला.
धनंजय बिजले लिखित ‘महामुद्रा’चे नितीन गडकरी, शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. परब यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले ते म्हणाले की, सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. ते राजीनामा मागत आहेत, पण राजीनामा मागणारे तुम्ही कोण आहात?, असा सवाल कदम यांनी केला. यावेळी कदम यांनी ऍग्रिमेंट दाखवत काही खुलासेही केले. ते म्हणाले, सावली हॉटेल शरद शेट्टींना चालवायला दिलं होतं. यातील ऍग्रिमेंटमधील कॉलम 6 मध्ये असं म्हटलंय की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. अटींचं भंग होणार नाही. तर कॉलम 7 मध्ये म्हटलं आहे की, काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील. मालकाची जबाबदारी राहणार नाही.
Video : “माझं शरीर कमकुवत होतंय आता मी..” हमासच्या भुयारातील इस्त्रायली कैद्याचे अखेरचे शब्द
पुढं ते म्हणाले, करारनाम्यातील नियमांचा भंग झाल्याने तसेच अन्य गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढले, दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले आहेत. लायसन्स 13 तारखेला जमा केले आहेत. मात्र, अनिल परबने 18 जुलै रोजी विधिमंडळात विषय काढला. या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री यांचा काहीही संबंध नाही. ज्याला हॉटेल चालवायला दिलं होतं, त्यावर आम्ही तात्काळ कारवाई केली. त्यामुळे राजीनाम्याचा विषयच येत नाही, असं कदम म्हणाले.
विधानमंडळात केले गेलेले आरोप तात्काळ काढून टाकावेत आम्ही सभापतींना अर्ज दिलेला आहे, असंही कदम म्हणाले.
कितीही काव काव केलं तरी दखल घेत नाही…
कदम म्हणाले, उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत. कावळ्याने कितीही काव काव केलं तरी आम्ही त्याची दखल घेत नाही. डान्सबार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत. मी सर्वच पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले, त्यांच्यावर नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे, कोणालाही सोडलेलं नाही. जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्यात त्यांना उत्तर मिळेल, असा इशारा कदम यांनी दिला.