मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने सांगितले म्हणून…घायवळच्या शस्त्रपरवान्यांबाबत रामदास कदमांचा गंभीर आरोप
Ramdas Kadam यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहेत. यामध्ये आता रामदास कदम यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

Ramdas Kadam’s serious allegations regarding the arms licenses of Nilesh Ghaival : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे रामदास कदम आणि ठाकरे गट त्यातही अनिल परब यांचे एकमेकांवर वारंवार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्येच गुंड निलेश घायवळच्या शस्त्रपरवाण्यावरून रामदास कदम यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहेत. यामध्ये आता रामदास कदम यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी हा दावा केला. योगेश कदम यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र मी देखील गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्य मंत्राला देखील क्लीन चीट देण्याची अधिकार असतात. हे निर्णय तुला आणि तुझ्या बापाला विचारून घेत नाही.
अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक! ’अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘मंबाजी’च्या भूमिकेत दिसणार
तसेच निलेश घायवळला दिलेल्या शस्त्र परवाना बाबत बोलताना ते म्हणाले, विधिमंडळात एका मोठ्या पदावर बसलेल्या मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितलं होतं. तो व्यक्ती ही न्यायाधीश आहे. म्हणून योगेश कदमने हा निर्णय घेतला. त्या व्यक्तीचे नाव मला घ्यायचं नाही. योगेश कदमने त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. ती व्यक्ती उच्च असण्यावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर त्यांनी शिफारस केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असे रामदास कदम यांनी सांगितले.
स्टार प्लसचं ‘NotJustMoms’ अभियान! FICCI मध्ये स्मृती इराणी-एकता कपूर यांनी सादर केला प्रोमो
मात्र ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. अशा पद्धतीने राज्यमंत्र्यांना आदेश देणे चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. हा निर्णय माझ्या मुलाने घेतला आहे. त्यामुळे मी नाव घेणार नाही योगेश कदम सांगतील. हा विषय त्यांचा आहे. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांना नाव कळवलं आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि नाव विचारोवं असेही यावेळी रामदास कदम म्हणाले.
त्याचबरोबर यावेळी निलेश घायवळबद्दल बोलताना योगेश कदम यांनी सांगितला आहे की, घायवळ यांना 2019 मध्ये सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता मिळालेली आहे, मागील दहा वर्षात म्हणजेच 2015 ते 25 मध्ये एकही गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला नाही, त्यामुळे शस्त्र प्रमाणासाठी जी व्यक्ती अपील करते त्यांची माहिती घेतली, जाते त्यामुळे पूर्ण शुद्धी तुम्ही हा निर्णय घेतला आहे.