मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यास राज्य सरकारला यश आलेले नाही. आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत असून, भुजबळांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला थेट विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर होत असून, जोरदार भांडणं होत आहेत. आगामी बैठकांमध्ये एख-दोन मंत्री मार खातील एवढेच नव्हे तर, मंत्री एकमेकांच्या अंगावर धाऊन जात आहे एवढे वातावरण खराब झाले आहे. (Sanjay Raut On Maratha Reservation & Eknath Shinde Cabinet Meeting)
Manoj Jarange : ठरलं तर! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्षमतेवर हल्लाबोल
राज्यात एकूणच उपस्थित झालेल्या परिस्थिवर भाष्य करताना राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्षमतेवर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, राज्यात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यावर कोणतही नियंत्रण नसल्याचे राऊत म्हणाले.
ईडी, सीबीआयसह इलेक्शन कमिशन पिंजऱ्यातील पोपट
मराठा आरक्षणाबरोबर यावेळी राऊतांनी ईडी, सीबीआयसह इलेक्शन कमिशनवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इलेक्शन कमिशन हे इडी आणि सीबीआयप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पिंजऱ्यातला पोपट आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात इलेक्शन कमिशन ने निर्णय घेतला हा पूर्णपणे अत्यंत सरकारच्या दबावाखाली घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वीस-पंचवीस आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवली. यात इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेले चरित्र दिसते असे म्हणत अशा कमिशनकडे जाऊन काय न्याय मिळणार असल्याचा सवालही राऊतांनी उपस्थित केला.शरद पवार ह्या पक्षाचे संस्थापक आणि त्यांचा पक्ष अजित पवार यांना दिला जातो असे इलेक्शन कमिशन आपल्याला लाभले आहे.
मुख्यमंत्र्यांना कुणी जुमानत नाही
मराठा आरक्षणावर बोलताना राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपसह कोणीच जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.
24 डिसेंबरनंतर काय होईल हे कोणी सांगू शकत नाही
मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळे 24 डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल. छगन भुजबळ मंत्री आहेत, ते ओबीसी समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे जर माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी, मुख्यमंत्र्यांकडे द्यावी समोर ठेवावी हवेत गोळीबार करून काय उपयोग असेही राऊत म्हणाले.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका…; उदयनाराजेंचं विधान
CM शिंदेंची भुजबळांना समज
मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतचं महाभारत सुरू झाल्याचे चित्र आहे. आरक्षणावरून छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) घेतलेल्या भूमिकेनंतर आता सत्तेतील नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) भुजबळांवर कडक शब्दांत टीका केली आहे. या सर्व घडामोडींवर अजितदादांनी वेळीच लक्ष घालत भुजबळांना आवरण्याचे आवाहन देसाईंनी केली आहे. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवाला देत भुजबळांना समज दिली आहे.
ओबीसी समाज किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं जाईल हीच भूमिका राज्य सरकारची होती आणि आहे. त्यामुळे यात कुणीही ओबीसीसह इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याची गरज नसल्याचे म्हणत भुजबळांना समज दिली आहे.
15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा
मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange patil) राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज (दि. 9) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.