दिल्लीत केजरीवाल सरकार पाडणार कृत्रिम पाऊस, 40 टक्के ढग आवश्यक

दिल्लीत केजरीवाल सरकार पाडणार कृत्रिम पाऊस, 40 टक्के ढग आवश्यक

Delhi Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्याचे समोर आले आहे. यावर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

ते पुढं म्हणाले की 20 नोव्हेंबरच्या सुमारास कृत्रिम पाऊस पाडता येईल. प्रत्यक्षात बुधवारी (8 नोव्हेंबर) दिल्ली सरकार आणि आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांसोबत बैठक झाली. आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी संपूर्ण योजना दिल्ली सरकारला सादर केली. आता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाला करणार आहे.

रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड, फोटो व्हायरल

गोपाल राय यांनी सांगितले की, सध्या हवामानात चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. तापमानात सातत्याने घट होत आहे. वाऱ्याचा वेग खूपच कमी आहे. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी स्थिरावली आहे. हे पाहता सरकार काय शक्यता आहेत याचा विचार करत आहे. या संदर्भात आम्ही 12 सप्टेंबर रोजी दिल्ली सचिवालयात अनेक तज्ञांशी बैठक घेतली. त्या बैठकीत आयआयटी कानपूरने प्रेझेंटेशनही दिले होते की प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो.

मंत्र्यांना लेट्सअपच्या ‘मिशन 2024’ दिवाळी अंकाची भुरळ !

पावसासाठी किमान 40 टक्के ढग आवश्यक
आयआयटी कानपूरचे सादरीकरण आम्ही पाहिले असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले. त्यांनी काही पथदर्शी प्रकल्प केले आहेत पण ते जून, जुलै आणि ऑगस्टच्या पावसाळ्यात आहेत. हे लक्षात घेऊन हिवाळ्यात दिल्लीत पाऊस पडायचा असेल तर त्यासाठी तपशील तयार करण्याची विनंती आम्ही त्यांना केली होती.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका…; उदयनाराजेंचं विधान

सध्याच्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आम्ही त्यांच्यासोबत दुसऱ्यांदा बैठक घेतली. काय करता येईल हे त्यांना समजावून सांगण्यात आले. तज्ज्ञांनी सांगितले की, किमान 40 टक्के ढग आवश्यक आहेत. 40 टक्के ढगांशिवाय पाऊस पडू शकत नाही.

20-21 नोव्हेंबर रोजी ढग तयार होण्याची शक्यता
दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले की 20-21 नोव्हेंबर रोजी दिल्लीत ढग तयार होण्याची शक्यता आहे. आम्ही आमचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube