मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार (Sharad Pwar) आणि अजितदादांमध्ये दोन गट तयार झाले असून, पवारांनी त्यांच्या हयातील आपला फोटो न वापरण्याच्या सूचना अजितदादा गटाला दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पवारांचा फोटो अजितदादांच्या गटाकडून वापरला जात असून, काल (दि.16) पवारांनी माझ्या परवानगीशिवाय आपला फोटो वापरणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच आता काका-पुतण्याच्या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ओढलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आता नंबर काँग्रेसचा; विखेंच्या दाव्याने खळबळ!
पवारांच्या फोटो वापरण्यावरून राऊतांनी शिवसेना फुटीचा संदर्भ दिला. यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना फोटो न लावण्यास सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत कुणाला तरी इशारा दिला होता. माझा फोटो वापरू नका. तुम्ही माझ्यापासून दूर गेला. माझा विचार तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही दूर गेला ना, मग माझा फोटो वापरू नका, असं बाळासाहेब म्हणाले होते, असे म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नाव न घेता टीका करत काका-पुतण्याच्या वादात राज ठाकरेंना ओढलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार जर देव आहेत, तर देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांनी काल परखडपणे भाष्य केलं आहे, त्या देशाच्या भावना आहेत. यावेळी पवारांनी जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल अशी भीतीदेखील व्यक्त केली आहे.
रोहित पवार, तानाजी सावंत भिडले; ‘खेकडा’ अन् ‘बारामती’च्या पॅकेजचा असाही किस्सा!
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हयातीत त्यांचा पक्ष तोडण्यात आला आणि फुटलेल्या पक्षाला चिन्ह आणि नावाची मान्यता दिली. शरद पवारांच्या सोबत देखील हेच झालं. देशाच्या संसदीय लोकशाहीची निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटत आहे. आज शरद पवारांच्या बाजूने देखील लोक फुटून गेले आणि म्हणतात की, शरद पवार हे आमचे लोकनेते आहेत. हे कसं काय तुम्हाला शरद पवार कशाला हवेत? बाळासाहेब कशाला हवे आहेत? तुमच्यात धमक आणि हिम्मत नाही आहे का? असे प्रश्न त्यांनी अजितदादा आणि राज ठाकरेंना विचारले आहेत.
इंडिया अलायन्सची तयारी अत्यंत जोरात
मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया अलायन्सची स्थापना केली आहे. इंडियाची आगामी बैठक मुंबईत होणार असून, या बैठकीची तयारी अत्यंत जोरात सुरू आहे. 31 ऑगस्ट रोजी ही बैठक मुंबईतील ग्रँड हयातमध्ये सुरू होईल. 27 नेत्यांना याची निमंत्रण देण्यात आलेली असून पाच राज्यांचे मुख्यमंत्री यात सहभागी होणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.