Download App

फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे; आमदारांना उद्देशुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NIA च्या मोस्‍ट वॉन्‍टेड लिस्‍टमधील खलिस्तान्यांना मदत करणाऱ्या गँगस्टर सुखदूल सिंगचा खात्मा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून निर्णय घेतला नाही तर, संसदीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल असेही राऊत म्हणाले. आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नार्वेकर यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल.

माझ्यासारख्या महिलांना आरक्षण नको, हा सरकारचा जुमला; आरक्षणाच्या बिलावर सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या?

राज्यात सध्या सत्तेत असणारे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार हे जनतेला फसवून सत्तेत आलेले सरकार आहे. शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांना एकतर पैसे मिळाले असतील किंवा या सर्वांना ईडी आणि सीबीआयची भीती वाटत असेल. त्यामुळेच राज्यात असे फसवणूक करून सत्ता स्थापन करण्यात आली आहे.

Sanjay Raut : प्रफुल्ल पटेलांचा पक्ष कोणता? राऊतांनी दिलं खोचक उत्तर

यावेळी राऊतांनी काल (दि. 20) लोकसभेत मंजूर झालेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरून भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, या विधेयकाला एमआयएम सोडून सर्व पक्षांनी पाठिबा दिला आहे. मात्र, अनेक दिग्गज नेते पुन्हा सभागृहात निवडून येऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हे विधेयक सभागृहात आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. महिलाना आरक्षण देऊन त्यांचे सबलीकरण होत नाही तर, त्यांचा सन्मान आणि अधिकार जपणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us