Download App

Sanjay Raut : रामदास कदम झाले… आता उद्धव ठाकरे आता दादा भुसेंना झोडपणार…

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांना मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार असे सांगितले आहे. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जेवढी मोठी सभा झाली तशीच मालेगाव येथे 26 तारखेला सभा होणाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अद्वय हिरे यांची इच्छा होती की मालेगाव येथे सभा व्हावी. हिरे कुटूंबियांची येथे मोठे काम आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. मालेगाव हे शिवसेनेचंच आहे. मालेगाव हे गद्दारांचे नाही, असे म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर टीकी केली आहे. मालेगावच्या सभेकडे राज्याचं लक्ष आहे, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील व भारतातील मुस्लीम समाजाचा शिवसेनेला मोठा पाठिंब मिळतो आहे. मुस्लीम समाजाने फक्त मोदींनाच मतं द्यावी का?, असा खोचक प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

तसेच राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर आहे, शेतकरी रस्त्यावर आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार आहे का नाही परिस्थिती आहे, अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कधी घरी जावे लागेल हे त्यांना माहिती आहे म्हणूनच  राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडले आहेत, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

फडणवीसांचा शब्द पाण्यात, अजितदादांनी भातखळकरांना फटकारले..

जो महाराष्ट्र देशात अग्रेसर होता, त्याचीच आता पिछेहाट सुरु आहे. राज्यात सरकार नक्की कोण चालवतंय हेच सांगता येत नाही, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील निशाणा साधला आहे.

Tags

follow us