Download App

Badlapur Encounter: गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया…

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करतांना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, असं शरद पवार म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Badlapur Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde)पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. यावर आता आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. दरम्यान, दरम्यान, या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहे. यावर आता शरद पवारांन (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली.

Badlapur Encounter: पोलिसांची बंदूक सामान्यतः लॉक, मग ती आरोपीने वापरलीच कशी? वकील असीम सरोदेंचा सवाल 

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करतांना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, असं पवार म्हणाले.

शरद पवारांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करतांना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलं, असं भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्सूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे, असं पवार यांनी म्हटलं.

शिंदेने बंदूक हिसकावली अन् पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, कसं झालं बदलापूर आरोपीचं एन्काऊंटर? 

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं?
अनिल देशमुख यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची माहिती मिळाली. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसाचे पिस्तूलही कसे हिसकावू शकतो? सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता, तितकेच दोषी शाळा चालक, भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काउंटरची फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.

दरम्यान, जीपमधून प्रवास करत असताना अक्षयने पोलिसांच रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. याशिवाय, गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. बदलापूरच्या शाळेतील दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती.

follow us