Download App

हो, आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् संघाच्या कामचं कौतुक

  • Written By: Last Updated:

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवावर शरद पवारांनी पहिल्यांदाच आपण गाफिल राहिल्याचे कबुली दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान पवारांनी ही कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पवारांनी संघाच्या कामाचे कौतुकही केले.

‘आता तर शक्य नाही पण कॉलेजमध्येही अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही…’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

त्यांनी पराभव गांभीर्याने घेतला अन्

राज्यस्तरीय आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, लोकसभेला आपल्याला मिळालेल्या मोठ्या यशामुळे आपण हुरवळून गेलो आणि गाफिल राहिलो. पण आपले प्रतिस्पर्धी विरोधकांनी त्यांचा पराभव गांभीर्याने घेतला आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले आणि त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला. यावेळी त्यांनी दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे पवार म्हणत पवारांनी एकप्रकारे संघाच्या कामाचे कौतुकचं केले आहे.

ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील ‘ते’ CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल…; उत्तमराव जानकर

सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू

पवार पुढे म्हणाले, आपला पक्ष सत्तेत जाणार या फक्त अफवाच आहेत. आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील पंधरा दिवसांत तुम्हाला संघटनेत मोठे बदल पहायला मिळतील. 1999 मध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आजही निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी आणि गमावण्यासाठीही काही नाही असे शरद पवार म्हणाले. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाऊ असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

follow us