Share Market Crash Today : भारतीय शेअर बाजारात आज (Indian Share Market) कमालीची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला (Share Market) त्यामुळे गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील (Iran Israel War) युद्धाचाही मोठा फटका या शेअर बाजाराला बसल्याचे दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स १२६४.२० अंकांनी घसरून ८३,००२.०९ वर उघडला आहे. या कारणांमुळे शेअर बाजारात आज मंदी दिसत आहे. एनएसई निफ्टी ३४४.०५ अंकांनी कमी होऊन २५,४५२.८५ अंकावर उघडला.
आणि ह्याच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. एनएसई निफ्टीसह बँक निफ्टीही जबरदस्त घसरणीसह सुरू झाला. सुरुवातीच्या काही मिनिटांत 550-600 अंकांच्या घसरणीचा ट्रेंड दिसून आला. एनएसई निफ्टीच्या 50 पैकी 46 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. फक्त चार शेअर्समध्ये किरकोळ घट दिसून येत आहे. आज एफअँडओ सेगमेंटच्या फ्रेमवर्कमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचा ट्रेंड दिसला. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणावही यामागे एक मोठं कारण असल्याचे सांगण्यात आले.
Share Market Holiday : आज BSE-NSE वर कोणताही व्यवहार होणार नाही; बाजार कधीपर्यंत असणार बंद?
आज सकाळी ९.३५ वाजता सेन्सेक्स ६०३.५७ अंकांच्या घसरणीवर आहे आणि ८३,६६२.७२ वर आला आहे. याचा अर्थ असा आहे की आज शेअर बाजार ज्या घसरणीसह उघडला होता त्यातील निम्मी घसरण कव्हर करण्यात आली आहे. निफ्टीत २२४.७५ अकांची घसरण अजूनही कायम आहे. निफ्टी सध्या २५,५७२.१५ वर व्यवहार करत आहे.
शेअर बाजाराला सुट्या
नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी
१५ नोव्हेंबर (शुक्रवार)- गुरुनानक जयंती
२५ डिसेंबर (बुधवार) – ख्रिसमस
MCX सुट्ट्या
१ नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी – पहिले सत्र बंद राहील.
१५ नोव्हेंबर (शुक्रवार) – गुरु नानक जयंती – पहिले सत्र बंद राहील.
२५ डिसेंबर (बुधवार) – ख्रिसमस
काल शेअर बाजार कसा होता?
स्थानिक शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरण झाली. ऑइल आणि गॅस आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे सेन्सेक्सला ३३.४९ अंकांचे किंचित नुकसान झालं. बीएसईचा ३० शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स ३३.४९ अंकांच्या किंवा ०.०४ टक्क्यांच्या घसरणीसह ८४,२६६.२९ अंकांवर बंद झाला होता.
व्यापारादरम्यान, तो ८४,६४८.४० अंकांच्या उच्चांकावर पोहोचला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील १३.९५ अंकांच्या किंवा ०.०५ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह २५,७९६.९० अंकांवर बंद झाला होता.
शेअर बाजाराची आज तेजीसह सुरुवात; निफ्टी 80 अंकांनी वधारला, तर सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला