Naresh Mhaske On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये रामलल्लांवर विधान केल्यामुळे राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड हा महाराष्ट्राला हिरवा आणि दुतोंडी साप असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले आहेत. त्यामुळे आता आव्हाड आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाल्याचं दिसून येत आहे.
Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट
नरेश म्हस्के म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात हिरवा साप आणि दुतोंडी साप म्हणतात. ते रात्रीचे ट्विट करतात आणि सकाळी डिलिट करतात. रात्री त्यांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा. नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे, कदाचित ते त्या दिवसापासून ते आतापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील. आव्हाड यांच्याविरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे. ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचे एवढं मातोश्रीचे जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी प्रेम होते का? असा सवालही नरेश म्हस्के यांनी यावेळी केला आहे.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार ‘अॅनिमल’; कुठे अन् कधी पाहाल?
तसेच कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही मातोश्रीला दिला होता तरी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? त्यांचा कुठला आणि कसला अभ्यास, यापूर्वी ऋषी मुनींनी केलेला अभ्यास हा फेल आहे का? राज्यघटनेत सर्व जाती धर्माचा आदर करा, असे म्हटलं आहे. खुर्चीसाठी मातोश्रीने हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं, भूमिका मांडावी, असंही खुलं आव्हान म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
लेट्सअप विश्लेषण : तिसरी बार मोदी सरकार! भाजपचा न डगमगता 400 जागांचा दावा कुणाच्या जोरावर…
जितेंद्र आव्हाड रात्रीचे बुवा आणि मांत्रिकांच्यामध्ये बसलेले असतात. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात आणि वेगवेगळ्या बुवा बाबांचे गंडेदोरे बांधतात. महाराष्ट्र हिंदुस्थानातील लोकांची माथी भडकवण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत. दंगली भडकवण्याचा त्यांचा कट आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर बोलत नसतील तर त्यांनी वक्तव्याला समर्थन दिल आहे असं मी मानतो, असंही ते म्हणाले आहेत.
राऊत मूग गिळून बसलेत का?
जितेंद्र आव्हाड यांच्या रामाबद्दलच्या विधानाशी मातोश्री आणि खासदार संजय राऊत सहमत आहेत का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व असा सवाल उपस्थित करीत म्हस्के यांनी ठाकरेंसह राऊतांवरही निशाणा साधला आहे.