Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट

Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट

Houthi Attacks in Red Sea : लाल समुद्रात हुती बंडखोरांनी उच्छाद मांडला (Houthi Attacks in Red Sea) आहे. बंडखोरांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेने कठोर (America) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि त्याच्या 12 मित्र देशांनी हुती बंडखोरांना निर्वणीचा इशारा दिला आहे. लाल समुद्रात जहाजांवर हल्ले बंद करा अन्यथा सैन्य कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा या बंडखोरांना दिला गेला आहे. इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धाला (Israel Hamas War) उत्तर म्हणून यमनच्या दहशतवाद्यांनी 23 हल्ले केले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांना आणखी इशारा मिळेल या भ्रमात त्यांनी राहू नये, बायडन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

या देशांच्या निवेदनानंतर व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. या निवेदनावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बहरीन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलँड, सिंगापूर आणि ब्रिटेनच्या सह्या आहेत. याव्यतिरिक्त अमेरिकेने बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेलाही हुती बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच बंडखोरांना समर्थन देणे चालू ठेवायचे की नाही याचा विचार इराणने करावा असेही स्पष्ट शब्दांत सांगितले.

या हल्लेखोरांना तत्काळ संपवणे आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजे आणि चालक दलांना मुक्त करण्याचे आवाहन या देशांनी केले. या उपरही जर हुती बंडखोरांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या तर परिणाम भोगण्याचीही तयारी त्यांनी ठेवावी. हुती बंडखोरांचे म्हणणे आहे की त्यांच्या हल्ल्यांचा उद्देश गाझातील इस्त्रायलचे हल्ले समाप्त करण्याचे आहे.

महागाईचा भडका उडणार? हूथी बंडखोरांमुळे भरली जगाला धडकी

कोण आहेत हूथी बंडखोर?

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. हूथी हा येमेनमधील शिया मुस्लीम समुदायाचा एक सशस्त्र अतिरेकी गट आहे. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हुसैन अल हूथी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या नावावरुव या संघटनेला हूथी हे नाव मिळाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube