Download App

सहा महिन्यात पुतळा तयार; शिल्पकाराने आयुष्यात पहिल्यांदा मोठा पुतळा उभारला !

हा पुतळा कल्याण येथील जयदीप आपटे यांनी बनविलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनविला असल्याचे सांगितले होते.

  • Written By: Last Updated:

Shivaji Maharaj statue inaugurated by PM Modi last year collapses: मागील वर्षी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्गमधल्या मालवण येथील राजकोट किल्लावर शिवरायांचा (chatrapati Shivaji Maharaj statue) पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते 4 डिसेंबर 2023 ला या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. आता आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता जुंपली आहे. तर स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तर पुतळ्याचे काम सुरू असताना स्थानिक लोकांकडून पुतळ्याचा निकृष्ट दर्जाच्या कामासंबंधात अनेकदा तक्रारी झाल्या. परंतु तक्रारींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आमदार वैभव नाईकांनी केलाय. हा पुतळ्या किती दिवसात तयार झाला. पुतळा कुणी तयार केला आहे, हा प्रश्न समोर येत आहे.

Video : आमदार वैभव नाईक संतापले, सिनेस्टाईल ऑफिसची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

हा पुतळा कल्याण येथील जयदीप आपटे यांनी बनविलेला आहे. त्याबाबत आपटे यांची एक मुलाखत सनातन प्रभातमध्ये छापून आली होती. त्यात त्यांनी पुतळ्याबाबत सर्व माहिती दिली होती. तसेच त्यांनी आपल्या जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनविला असल्याचे सांगितले होते. 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा आहे. असा पुतळा बनविण्यासाठी तीन वर्षे लागतात. परंतु हा पुतळा सहा महिन्यात बनविण्यात आला आहे. हा पुतळा जून 2023 ला बनविण्यासाठी सुरुवात केली आणि तो डिसेंबरमध्ये तयार करण्यात आला होता.

आयुष्यात पहिल्याच मोठा पुतळा

जयदीप आपटे यांनी आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा पुतळा तयार केला होता. कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळले तेव्हा संधी मोठी आहे, सगळे व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल. पण जरी चूक झाली तर सगळेच संपेल, असे वाटले. पण म्हटले काय व्हायचे ते होऊ दे, संधी हातातून सोयडायची नाही, असे ठरले. कामाच्या आधी तीन-चार शिल्पे बनविण्याची संधी मिळाली मिळाली होती. ती अगदी दीड-दोन फुटांची होती. पण ती करतांना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी विचारणा झाली होती. एखादा पुतळा तयार करणार का ? अशी विचारणा झाली होती. भारतीय नौदल हे काम करून घेणार होते. आपटे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे तीन नमुने बनविले होते. त्यातील दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बनविण्यात आले होते. तिसरा नमुना अचानक घडलेले शिल्प होते, तेच शिल्प निवडण्यात आले होते.

शिवरायांचा पुतळा कोसळला! आमच्यासाठी दुर्देवच, मुख्यमंत्री शिंदेंनी मौन सोडलं


जागेवर पुतळा जोडला

तीन डायमेन्शन प्रिटिंगचा आधार घेऊन हे काम पूर्ण केले होते. त्यासाठी 18 नवीन प्रिंटर उभे केले होते. तर कास्टिंग झालेले तुकडे एकत्र करणे महत्त्वाचे काम होते. खरेतर पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जावेवर नेला जातो. परंतु पुतळा नेण्यासाठी रस्ते लहान होते. तर पुतळा तयार करण्यासाठी वेळही कमी होता. त्यानंतर पुतळा जागेवर जोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 27 ऑक्टोबरपासून जागेवर पुतळ्याचे जोडकाम सुरू झाले. प्रत्येक दिवसाला अनेक अडचणी आले. वीजेची अडचण होती. तसेच पावसाचा अडथळा होता, या सर्व परिस्थितीत पुतळा उभारण्यात आल्याचे आपटे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

follow us