Sanjay Raut : ‘निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण’.. राऊतांनी ठणकावलं!

Sanjay Raut: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा देशाचा नव्हे तर भाजपाचा राजकीय सोहळा आहे. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का, […]

Sanjay Raut : 'निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण'.. राऊतांनी ठणकावलं!

Sanjay Raut : 'निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण'.. राऊतांनी ठणकावलं!

Sanjay Raut: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा देशाचा नव्हे तर भाजपाचा राजकीय सोहळा आहे. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का, आम्ही नंतर अयोध्येला जाणारच आहोत, अशी टीका राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, भाजपाचा चार दिवसांचा राजकीय कार्यक्रम झाला की मग आम्ही अयोध्येला जाऊ. निमंत्रण देणारा भाजप कोण? देवाच्या दर्शनासाठी आमंत्रणाची गरज नसते. देव स्वतः आपल्या भक्तांना बोलावत असतो.

Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’ राऊतांचा हल्लाबोल

राऊत पुढे म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विनाकारण राजकीय स्वरुप दिले जात आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळीही त्यांनी असाच प्रकार केला होता. आताही त्यांनी तोच प्रकार केला आहे. भाजप आणि प्रभू श्रीराम यांचे काहीही नाते नाही, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. अयोध्येला जाण्यासाठी आम्हाला कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही. भाजपाचा पॉलिटिकल इव्हेंट संपला की आम्ही अयोध्येला जाणारच आहोत.

पार्टीच्या प्रोग्राममध्ये कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? ती त्यांची मर्जी आहे. असे असते तर पूर्ण देशाला निमंत्रण गेलं असतं. हिंदू संस्कृतीमध्ये असे होत नाही. आम्ही आणि पवार असेच बसलो आहोत का? असा सवाल उपस्थित करत आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ पण भाजपाचा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर जाऊ असे राऊत यांनी सांगितले. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात येऊन अयोध्या धाम असे करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे. अयोध्येच्या नावाबरोबर ओळखले जाणार आहे. आता त्याचप्रमाणे विकासही करा नुसतेच नावं नका बदलू असा टोला लगावला.

Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल

राहुल गांधींच्या यात्रेचे स्वागत करणार 

भारत आणि सर्वांना जोडण्याचं काम काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या यात्रेमध्ये केलं आहे. या देशाचे संविधान न्याय हे वाचवण्याचं काम आता करायचं आहे, त्यामुळे ही संकल्पना घेऊन राहुल गांधी भारत न्याय यात्रा घेऊन यात्रा काढत आहेत. त्याचे आम्ही स्वागत करत आहोत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Exit mobile version