Sanjay Raut on BMC Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंचे फक्त २० आमदार निवडून आले. या पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. आघाडीतून बाहेर पडा असा सूर ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आधीपासूनच लावला आहे. आता याच दिशेने त्यांची पावले पडू लागल्याचे दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे नक्की कोण?, पोलीस यंत्रणा सतर्क होताच सत्य आलं समोर
मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरू झाल आहेत हे सगळं तुम्ही पाहत आहातच. आम्ही मुंबईत स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढलो तर याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही. मुंबई सध्या ओरबाडली जात आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. निवडणुका स्वतंत्रपणे लढू असे मी म्हणत नाही पण कार्यकर्त्यांची तशी भावना आहे, असे संजय राऊत म्हणाले.
लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करत. आता आम्ही पुढे जात आहोत. स्वबळावर लढण्याच्या आता ज्या चर्चा सुरू आहेत. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी वेळी होत असतातच. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या कमी असते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढलेली असते. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा कमी होते. त्यामुळे स्वबळाच्या चर्चा होत असतात त्यात काही विशेष नाही असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू