Download App

“दुर्दैवाने महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे”, राऊतांचा जोरदार पलटवार

दुर्दैवाने आज राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. 

Sanjay Raut replies Raj Thackeray : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज देशासह राज्यभरात (Dussehra Gathering) दसऱ्याचा सण साजरा होत आहे. दुसरीकडे राज्यात विविध पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, तुमची प्रतारणा केली. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आता वचपा काढण्याची वेळ आली आहे. तसंच, “या सत्ताधाऱ्यांनी तुमची फसवणूक केली आहे. आत एकदा माझ्या सहकाऱ्यांना काम करण्याची संधी द्या, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र करून दाखवतो असंही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातन प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. दुर्दैवाने आज राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

तुमच्यातील राग दिसत नाही; आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या वक्तव्यांबाब प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे अगदी बरोबर बोलले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरुच आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे दु्र्दैवाने उभे राहिले होते. महाराष्ट्राची लूट दिल्लीतले सत्ताधीश खास करुन मोदी आणि शहा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत या व्यापाऱ्यांच्या मागे उभे राहिले त्यांनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

‘आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आपण मात्र फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतो. आपल्या हातात आपट्याच्या पानांशिवाय काहीच राहत नाही आणि बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत. पण आपण मात्र, कधी स्वतःच्या आयुष्यात तर कधी जातीपातीत मशगुल असतो असंही ते म्हणाले आहेत.

‘हा राजा का भिकारी’; अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफांची समरजितसिंह घाटगेंवर जहरी टीका

फ्लायओव्हर्स बांधणं म्हणजे प्रगती नव्हे. आपल्या हातात मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे याला प्रगती म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण अजूनही चाचपडत आहोत. असं असले तरी तुमच्यातील राग मला दिसत नाही, त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चाताप करत बसता,” अशी खंतही यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 13 मागण्या; CM शिंदेंनी वायुवेगाने फिरवली सूत्र

Sanjay Raut : वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

Sharad Pawar : महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?, शरद पवारांनी काय दिलं उत्तर

 

follow us