Download App

Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार

Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. यंदा मात्र निवडणुकीची गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादी एकसंध राहिलेली नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार गटाचा उमेदवार दिला जाणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुळे यांना आव्हान देणार असल्याच्या बातमीने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहण्यास मिळणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या घडामोडींवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले, मला वाटत नाही की बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक होईल. त्यामुळे या अफवा बंद करा. या सगळ्या अफवा आहेत. असं काहीही होणार नाही. राजकारण सगळ्यांना कळतं. आम्हीही महाराष्ट्रात राजकारण करतोय. आम्हालाही ते कळतं. पवार कुटुंबाविषयी आम्हाला माहिती आहे. बारामतीचं राजकारण आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे या ज्या अफवा पसवण्याचं काम जे कोण करत आहेत त्यांनी हे थांबवावे. बारामतीत कुणीही लढलं तरी सुप्रिया सुळेच जिंकतील असंही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारच्या चर्चांवर कुणीच विश्वास ठेऊ नये. जोपर्यंत उमेदवारी घोषित केली जात नाही तोपर्यं अशा चर्चा करून वेळ वाया घालवू नये. बारामती मतदारंसघात आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सु्प्रिया सुळेच उभ्या राहतील. यानंतर त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल हे पाहावे लागेल.

नको नको ढाब्यावर जाऊ…बावनकुळेंचं निमंत्रण हेरंब कुलकर्णी यांनी स्वीकारलं

Tags

follow us