नको नको ढाब्यावर जाऊ…बावनकुळेंचं निमंत्रण हेरंब कुलकर्णी यांनी स्वीकारलं
मुंबई : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असून, आता बावनकुळेंनी दिलेले ढाब्यावरचे निमंत्रण सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Herabha Kulkarni) यांनी स्वीकरले आहे. हे निमंत्रण स्वीकराताना कुलकर्णी यांनी एक कविता सादर केली आहे. विविध प्रकरणांवर भाष्य करणाऱ्या या कवितेच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. कुलकर्णी यांची ही कविता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. (Herabha Kulkarni Poet On Chandrashekhar Bawankule Dhaba Statement)
सिंह आला पण गड गेला! पवारांचा विजय; पॅनेलचा पराभव : अनेक वर्षांच्या वर्चस्वाला भाजप नेत्यांचे हादरे
हेरंब कुलकर्णींची कविता काय?
चला, आपण धाब्यावर जाऊ…
मी त्यांना म्हणालो पाण्यात तरंगणारे तुमचे नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले नको नको, त्यापेक्षा आपण, धाब्यावरच जाऊ…..!!!
धाब्यावर जाताच, मी म्हणालो- दारू दुकाने वाढवण्याची, निषेधार्ह बातमी दाखवू का ? ते म्हणाले ” हवी ती चव आत्ता तुम्हाला चाखवू का ?”
मी विचारले सहजपणे , समृध्दी महामार्गावर, अपघात का बरे वाढले ? प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकीटच बाहेर काढले …..
चला, आपण धाब्यावर जाऊ…
( हेरंब कुलकर्णी)मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहूते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले " हवी ती चव…— Supriya Sule (@supriya_sule) September 27, 2023
न्यायमूर्ती लोया नागपुरात,नेमके कशाने वारले ? उत्तर म्हणून त्यांनी, समोर मेन्यू कार्ड धरले …
शेतकरी आत्महत्या भागात, दौऱ्यावर कधी जाऊ या ?ते म्हणाले सांगा , जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?
मी विचारले कंटाळून, अच्छे दिन आता सांगा ना कधी येणार ? ते म्हणाले सांगा आधी, तुम्ही गिफ्ट काय घेणार ?
कंटाळून विचारले शेवटी मी – ९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची रोपटी आता कधी वाढायची ? त्यांनी विचारले, पत्रकारांची ताडोबात ट्रीप कधी काढायची ?
आजूबाजूला सगळे मद्यपी बघत आम्ही धाब्यावरून निघत होतो.. सत्तेची नशा करते, किती बेधुंद हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..
Shinde Camp : आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत; दिवाळीत उडणार राजकीय फटाके
पहिले विधान अन् नंतर सारवासारव
बावनकुळेंनी पत्रकारांवर केलेल्या विधानानंतर विरोधपक्षातील नेत्यांसह सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. तापलेले वातावरण आणि चहुबाजूंनी होणाऱ्या टीकेनंतर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले की, पत्रकारांना चहा पाजा म्हणजे, पत्रकारांना सन्मान द्या, मतदारसंघात जनतेचा कल काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घ्या. पत्रकार इतके महत्त्वाचे आहेत, की ते समाजाचं मत बदलू शकतात. शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. समाजात काय चाललंय हे त्यांच्याकडून जाणून घ्या, असा सल्ला मी कार्यकर्त्यांना दिल्याचे बावनकुळेंनी सारवासावर करताना म्हटले होते.