Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. यालाच आता शिवसेना ठाकरे गटाने बॅनरबाजीतून उत्तर दिलंय.
मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला होता. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबई डुबली अशी टीका त्यांनी केली (Maharashtra Politics) होती. यावरुनच भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आशिष शेलार यांच्या या टिकेला आता शिवसेना ठाकरे गटाने ूबॅनरबाजीतून उत्तर दिले आहे.
एफडीआयमध्ये भारताचा रेकॉर्ड; गुंतवणूकदारांसाठी परदेशात नवा विक्रम, वाचा सविस्तर
मुंबईच्या बांद्रा परिसरात भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘बाताश्री शेलार’ असा उल्लेख असलेले हे बॅनर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
शिवसेना नेते अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या या बॅनरांमध्ये शेलारांवर तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. बॅनरवरील मजकूरात म्हटलं आहे, “अहो भाताचे शेलार, मुंबईकरांनी सध्याचे दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथ मारून आत शिरलात. आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमच्या तोंडात माईकमध्ये!”
“जयजयकार करू अहिल्यादेवींचा..” अहिल्यानगर गौरव गीताचे उत्साहात लोकार्पण
ही टीका शेलार यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यासंदर्भात हाती घेतलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली होती. यासोबतच मिठी नदी परिसरातील गाळ काढण्याच्या कामाचा अहवालही मागवला होता.
शेलारांच्या या मागण्यांनंतर शिवसेनेने त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. हे बॅनर केवळ राजकीय आरोपांपुरते मर्यादित न राहता सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. मुंबईतील स्थानिक राजकारणात यामुळे तापलेले वातावरण अधिकच गरम होण्याची शक्यता आहे. आता शेलार यांच्याकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.