Download App

Sanjay Raut : शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार? मोदी-शहांचं नाव घेत राऊतांचा गौप्यस्फोट!

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थान धुळीस मिळाले आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल. राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना दिला गेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, असे धक्कादायक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

Vijay Vadettiwar : पुन्हा येऊ शकत नाही, हे माहिती असल्याने ट्विट डिलिट; वडेट्टीवारांचा टोला

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील भाजप नेतृत्वावर घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदे यांना जावं लागेल. मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, असे राऊत म्हणाले. भाजपकडून काल देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. काही वेळानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली.

.. तर आम्ही फडणवीसांचं स्वागतच करू 

राऊत म्हणाले, त्यांच्या मी पुन्हा येईलचं आम्ही सध्या स्वागत करतो. कारण ते कायदेशीर सरकार असेल आम्ही कायदा आणि घटना मानणारी लोकं आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. तेच बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे. हे अत्यंत चुकीच आहे. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर मुख्यमंत्री येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. सातत्याने गेल्या पाच वर्षापासून मी पुन्हा येईन, असं सांगत आहेत. पण त्यांना पुन्हा घ्यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं. एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवले जातात, अशी टीका राऊत यांनी केली.

Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण

नेत्यांच्या बदनामीसाठीच शिंदे-अजितदादांना फोडलं

अजित पवार एकनाथ शिंदे यांना यासाठीच पक्षातून फोडलेलं आहे की त्यांच्या नेत्यांची बदनामी करावी. अजित पवार शरद पवारांच्या बदनामीचं वक्तव्य थंड डोक्याने ऐकत होते. याचा अर्थ त्यांचा स्वाभिमान मेलेला आहे. जेव्हा पवारांना पद्मविभूषण दिला होता. तेव्हा या लोकांनी भांग प्यायली होती का? असा सवाल राऊत यांनी विचारला. पवारांनी केलेल्या कामापैकी एक टक्का तरी काम त्यांनी करावं आणि मग पवारांवर टीका करावी. काही वर्षांपूर्वी हेच नरेंद्र मोदी बारामतीत येऊन शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत. त्यांचं बोट धरून मी राजकारणात कसा आलो? हे बोलत होते. ते मराठा समाजाच्या आंदोलनावर बोलले नाहीत, शेतकरी आत्महत्यांवर बोलले नाहीत, ते फक्त शरद पवार यांच्यावर बोलले. ज्या पवारांचा सन्मान या देशाने आणि राज्याने केला. ही एक विकृती आहे आणि या विकृतीचा अंत 2024 साली होईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

Tags

follow us