Download App

काळा घोडा कला महोत्सवात मोठी नाट्य पर्वणी; चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

Silver Screen Cinematic Horse In Kala Ghoda Festival : मुंबई (Mumbai) नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काळा घोडा महोत्सवात ( Kala Ghoda Festival) यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा (Cinematic Horse) साकारण्यात येणार आहे. सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे.

महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

काळा घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या (Entertainment News) जातात. यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस का घोडा या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार केला जात आहे.

Pune International Airport: विमानतळ सल्लागार समितीवर अनिल टिंगरे यांची नियुक्ती

कलाकारांनी कलाकारांसाठी तयार केलेला हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला दिलेली ही मानवंदना असणार आहे. या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य हे तांत्रिक टाकाऊ वस्तुतून आणि पर्यावरण पूरक साहित्याच्या वापरातूनच करण्यात येणार आहे. डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे. शाश्वत सिनेनिर्मिती या संकल्पनेवर या कलाकृतींच्या माध्यमातून भर देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार आणि मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांनी सांगितले.

यंदाचा काळा घोडा काळा महोत्सव नाट्य रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. हा महोत्सव 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव अनेक नाटकांसह प्रेक्षकांच्या भेटीस परत येतोय. या वर्षीची थीम ‘सिल्व्हर घोडा’ आहे. या महोत्सवात चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, नृत्य, कार्यशाळा आणि नाटके यांचा समावेश आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती आणि बंगाली भाषेत 35 हून अधिक नाटके सादर होणार आहेत.

follow us