महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर
Mamta Kulkarni Became Mahamandleshwar At Kinnar Akhara : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमधून अभिनेत्री (Bollywood Actress) ममता कुलकर्णीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ममता आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार आहे. ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) महाकुंभात पोहोचल्यानंतर संन्यासी बनली आहे. ममताने संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्यात त्यांना महामंडलेश्वर करण्यात आलंय. किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही (Mahakumbh 2025) पदवी दिलीय.
दीक्षा घेतल्यानंतर ममता आता आखाड्याची साध्वी म्हणून ओळखली जाणार आहे. याआधी ममताने एक व्हिडिओ जारी करून याबाबत माहिती दिली होती. तिने सांगितले की साध्वी झाल्यानंतर ती संगम, काशी आणि अयोध्येला जाणार (Kinnar Akhara In Mahakumbh 2025) आहे. ममता कुलकर्णीऐवजी महामंडलेश्वर ममता नंद गिरी म्हणून ओळखली जाणार आहे. यासाठी ममताने स्वत: प्रयाग राजमधील संगमच्या काठावर पिंड दान केल्याचे वृत्त आहे. तिचा पट्टाभिषेकही करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. ममताने भगवे कपडे घातलेले, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि खांद्यावर पिशवी असे फोटो समोर आलेत.
रायगडमध्ये भाजपची खेळी… ठाकरेंना शह, तटकरेंना टेन्शन, गोगावलेही गार…
ममता कुलकर्णी ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र आता तिने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली संन्यासाची दीक्षा घेतल्याचे समोर आलंय. संगमच्या काठावर स्वतःचे पिंड दान अर्पण करून ममताने आपला नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू केला. 24 जानेवारीच्या संध्याकाळी प्रयागराजमध्ये एका विशेष समारंभात ममता कुलकर्णीचा अभिषेक करण्यात आला. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी हेही यावेळी उपस्थित होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
Video : कराडला गोत्यात आणणाऱ्या धसांवर गंभीर आरोप; उपोषण करत पीडितेकडून न्यायाची मागणी
ममता कुलकर्णीने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘करण अर्जुन’, ‘तिरंगा’, ‘चायना गेट’, ‘बाजी’, ‘चुप्पा रुस्तम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ग्लॅमरच्या दुनियेत नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती 1996 मध्ये अध्यात्माकडे वळली. ममता सांगतात की, गुरू गगन गिरी महाराज यांच्या प्रेरणेने तिने धर्म आणि अध्यात्माचा मार्ग निवडला. ममता कुलकर्णी 25 वर्षे भारताबाहेर राहिली होती. आता ममताने स्वत:ला पूर्वीचं जीवन सोडून धर्म आणि अध्यात्मात स्वतःला वाहून घेतलंय.