Download App

आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळून जाणार : SIT च्या घोषणेनंतर राणेंचा मोठा दावा

  • Written By: Last Updated:

SIT : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना होणार आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे.

आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळून जाणार…

महायुती सरकरने दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये एसआयटीसाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. त्यातून सरकार दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय देत आहे. या दोघांच्या मारेकऱ्यांची चौकशी होईल आणि त्यांना योग्य शिक्षा होईल. मात्र यामध्ये आदित्य ठाकरे हे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस काढावी. तसे शक्य असल्याचं त्यांचा पासपोर्ट जप्त करा. असा दावा यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

अमित शाहंनी महिन्याभरात बोल खरे केले… एका छोट्या माणसाला ‘बडा आदमी’ बनवून दाखविले!

दरम्यान विरोधी बाकावरील नेत्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आवाज उठवत आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याचे बघायला मिळाले होते. नुसते आरोपच नाहीतर त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जोर लावून धरली होती. त्यानंतर राज्य सरकार या प्रकरणी पुन्हा एकदा पाऊलं उचलताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आता दिशा सालियान या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोदी-शहांनी मुख्यमंत्री केलेले भजनलाल शर्मा यांचे हे किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील….

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत(Sushant Singh Rajput) याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्याआधी दिशा सालियान (Disha Salian) हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून वारंवार आरोप केले जात होते.

Tags

follow us