Download App

सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार

मुंबई : महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून सातत्याने भष्ट्राचाराचा आरोप केला जात आहे. मुंबई महापालिकेत (BMC) 12 हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलेच घेरले होते. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत भ्रष्टचार मुद्दा तापत असताना असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल रामेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी हा पुरस्कार दिला आहे.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुंबईतील करोना योद्ध्यांना ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, धारावी येथे सेवा बजावणारे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ अनिल पाचणेकर, पास्कल सलढाणा व दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आले.

Eknath Shinde : थोडं थोडं प्यायचं असतं पण विरोधकांना लोटा भरुन प्यायची सवय

काही दिवसांपूर्वीच इक्बाल सिंह चहल यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते ईडी कार्यालयात देखील हजर झाले होते. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकणी इक्बाल सिंह चहल यांची चौकशी केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चहल यांच्यावर कोरोना काळात वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. चहल यांच्यावरील आरोपाच्या माध्यामातून भाजपने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष केले होते.

Tags

follow us