Supriya Sule on Raj Thackeray and Udhhav Thackeray Allince : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. त्यावर लगेचच माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे. यावरून आता शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राज ठाकरे असं म्हणाले की, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातील वाद मोठे आहेत. ही बातमी माझ्यासाठी अतिशय आनंदाची आहे. यावर मी दोघांनाही संपर्क साधला. आता माझ्या अंगावर काटा आलाय. आमची आणि बाळासाहेब ठाकरे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत. बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे.यानंतर जे काय बोलतात ते त्यांचे प्रवक्ते बोलता येत दोघे काही बोलत नाहीये. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मनाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. असं त्या म्हणाल्या तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्यावर विचारले असता त्या म्हणाल्या, ती पांडुरंगाची इच्छा आहे. पण नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजही आणि उद्याही.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एकच असून, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा.जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं.
मी आशावादी, दोघांनी मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे, चंदुमामांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्स सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.