मी आशावादी, दोघांनी मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे, चंदुमामांची पहिली प्रतिक्रिया

मी आशावादी, दोघांनी मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे, चंदुमामांची पहिली प्रतिक्रिया

Chandu Vaidya On Uddhav Thackeray and Raj Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आज सकाळपासून प्रसारमाध्यमांत रंगत आहे. एका कार्यक्रमात बोलताना येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असे संकेत राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे संकेत दिले तर आता ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य (Chandu Vaidya) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंदू वैद्य यावेळी म्हणाले की, मला या गोष्टीचा खुप आनंद होत आहे. मी आशावादी आहे. असं ठाकरे बंधू यांचे मामा चंदुमामा म्हणाले. शिवसेना आणि मनसे पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि युतीबाबत चांगला मार्ग काढावा असं मला वाटते असं देखील यावेळी ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र बसून कुठे आपण एकत्र येऊ शकतात आणि कुठे आपल्यात मतभेद आहे. याची चर्चा करावी असं देखील माध्यमांशी बोलताना चंदूमामा म्हणाले.

तर दोघांनी मराठी माणसांचा हित आणि महाराष्ट्राचा हित या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे असं मला वाटते असं देखील यावेळी चंदूमामा म्हणाले.

आता टँकरची वाट पाहावी लागणार नाही…, पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप; मंत्री विखेंची माहिती

लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेक यांच्या एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याची तयारी दर्शवली. मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी भांडणं, मतभेदू दूर ठेवून एकत्र यायला तयार आहे असं या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते.

2014 आणि 2017 साली धोका मग आता विश्वास कसा ठेवायचा? मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या