Video : भांडणं नव्हतीच मिटवून टाकली चला; राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल’

  • Written By: Published:
Video : भांडणं नव्हतीच मिटवून टाकली चला; राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल’

मुंबई : माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे. फक्त माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा असे उद्धव यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अटी-शर्तीच्या आधारावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. ते कामगार मेळाव्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Uddhav Thackray On Raj Thackeray Alliance Offer)

“घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल तर..”, उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना ओपन चॅलेंज!

एकत्र यायल तयार पण अट एकचं…

राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एकच असून, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा.

तेव्हा पाठिंबा आता विरोध अन् मग तडजोड चालणार नाही 

जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Video : अखेर ‘तो’ सोनियाचा दिन आलाचं; राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव

मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्स सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.

रणजित कासले यांनी केलेले खळबजनक दावे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने फेटाळले; वाचा, सविस्तर

परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube