Download App

मोठी बातमी! सूरज चव्हाण याला ईडीची कोठडी, कथित खिचडी घोटाळा प्रकरण अंगलट!

  • Written By: Last Updated:

Suraj Chavan: कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला काल अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला आज पीएमएलए न्यायालयात (PMLA court) हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : भावाची नव्या राजकीय वाटचालीची घोषणा 

17 जानेवारीला सूरज चव्हाणला ईडीने अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता ईडीने सूरज चव्हाणची  8 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सूरज चव्हाण यांचे वकील दिलीप साठाळे म्हणाले की, या घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचा सहभाग नाही, असे आम्ही न्यायालयाला सांगितले. एफआयआरमध्ये सूरज चव्हाण याचे नाव नाही. सूरज चव्हाण उत्तर देत नसल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. सुरज चव्हाणला पुढील पाच दिवस म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सूरज चव्हाण हा राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याने त्याला आरोपी म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Share Market : शेअर बाजारावर ‘संक्रांत’, गुंतवणुकदारांना 64 हजार कोटींचा फटका 

काय आहे खिचडी घोटाळा?

कोरोना काळाता स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही, अशा कामगारांसाठी लॉकडाऊन दरम्यान जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी पुरविण्याचे कंत्राट दिले होते. मुंबई महापालिकेने सांगितले की, पहिल्या चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणचे  नाव घेण्यात आले.

कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची चौकशी केली. अमोल किर्तिकर याच्या खात्यात ५२ लाख तर सूरज चव्हाण याच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचं समोर आलं होतं. चौकशीदरम्यान दोघांना खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा करण्यात आली. चौकशीत दोघांनी सांगितले की, फोर्स वन कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना हे पैसे पगार म्हणून मिळाले होते. हे दोघांनीही आपण या कंपनीसाठी सल्लागार म्हणून काम करत असल्याचं जबाबात सांगितल होतं.

follow us

वेब स्टोरीज