Share Market : शेअर बाजारावर ‘संक्रांत’, गुंतवणुकदारांना 64 हजार कोटींचा फटका
Share Market : भारतीय शेअर बाजारात Share Market सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex)830 अंकांनी तर निफ्टी (Nifty)290 अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (Profit booking) बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांच्या (Investors)संपत्तीमध्ये जवळपास 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…
आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात मिड कॅप (Mid cap)आणि स्मॉल कॅपमध्ये (Small cap)मोठी घसरण झाली. त्यानंतर मिड कॅप निर्देशांक 1300 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक 400 हून अधिक अंकांनी घसरला. गुरुवारी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी BSE सेन्सेक्स 314 अंकांच्या घसरणीसह 71,187 अंकांवर तर NSE चा निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 21,462 अंकांवर बंद झाला.
Sonu Sood ही झाला डीपफेकचा शिकार; तोतयाकडून पैशांची गरज असलेल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न
आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, इन्फ्रा हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर बँकिंग, आयटी, वित्तीय सेवा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
बाजारात सकाळी मोठी घसरण पाहिल्यानंतर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 तोट्यासह बंद झाले. तर 50 निफ्टी समभागांपैकी 22 वाढीसह आणि 28 तोट्यासह बंद झाले.
आज BSE वर कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल 369.71 लाख कोटी रुपयापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. त्याचे बाजार भांडवल बुधवारी अर्थात 17 जानेवारीला 370.35 लाख कोटी रुपये होते.
त्यामुळे बीएसईमध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 64 हजार कोटी रुपयांनी कमी झाले. अर्थातच गुंतवणुकदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.