दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : भावाची नव्या राजकीय वाटचालीची घोषणा

दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : भावाची नव्या राजकीय वाटचालीची घोषणा

बीड : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांची नवी राजकीय दिशा ठरवली असून त्याबाबत ते लवकरच किल्ले रायगडावरुन घोषणा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी मेटे ‘जय शिवसंग्राम’ या नावाने नवीन संघटनेची स्थापना करणार आहेत. (Brother Ramhari Mete has left the late Vinayak Mete’s Shiv Sangram organization.)

विनायक मेटे हयात असेपर्यंत मेटे कुटुंबीय आणि शिवसंग्राम संघटना यात सारे काही आलबेल होते. रामहरी मेटे हेही शिवसंग्राम संघटनेचे आघाडीवर राहुन काम करत होते. मेटे मुंबई किंवा राज्याच्या दौऱ्यावर गेल्यानंतर बीडमधील संघटनेचे कामकाज रामहरी मेटेच बघत होते. मात्र मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आणि संघटनेमध्येही संघर्षाची ठिणगी पडली. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि मुलगा आशुतोष यांच्याशी रामहरी यांचे पटेनासे झाले.

फडणवीसांनी नेते घडवले नाही तर चोरले; अंधारेंनी पक्षफोडी ते इमेज सगळंच काढलं

त्यानंतर आता रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच रायगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्यासोबत संघटनेतील किती पदाधिकारी सोबत येतील याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही, मात्र यामुळे शिवसंग्राम संघटनेच्या राजकीय ताकदीला मोठा फटका बसणार हे नक्की मानले जात आहे.

ज्योती मेटेंनीही खोचला पदर :

दरम्यान, रामहरी मेटे यांच्या बंडानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संघर्षाची तयारी दर्शवली आहे. विनायक मेटे यांनी रायगडावर ‘शिवसंग्राम’ची स्थापना केली आहे. त्यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या साथीने ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु ही संघटना कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.

‘पवार साहेब, ऐ पब्लिक है, सब जानती है’; राममंदिर मुद्यावरून बावनकुळेंच सणसणीत उत्तर

येणाऱ्या काळात जरूर संघर्ष करावा लागेल. पण दिवंगत विनायक मेटे यांच्याकडून आम्ही संघर्ष शिकलेलो आहोत. आता पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असाव्यात, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube