‘पवार साहेब, ऐ पब्लिक है, सब जानती है’; राममंदिर मुद्यावरून बावनकुळेंच सणसणीत उत्तर
Chandrasekhar Bawankule On Sharad Pawar : येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, राममंदिर (Ram Mandir) मुद्दावरून राजकारणही तापतांना दिसते. राममंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधींच्या काळात झाला. आता भाजप आणि आरएसएस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केली होती. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
IND vs AFG : रोहितचे तुफानी शतक, रिंकूची धुवांधार फिफ्टी; अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर
पवार साहेब, प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती, तर त्यांना कोणी रोखले होते? त्यावेळी मंदिर का बांधले गेले नाही?, असा सवाल करत बावनकुळेंनी यांनी शरद पवारांच्या टीकेला सनसनीत उत्तर दिले. ‘ऐ पब्लिक है, सब जानती है’ अशीही उपरोधिक टीका त्यांनी केली.
…म्हणून सरकारमध्ये बसलेल्यांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे; रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
राजीव गांधी यांनी राम मंदिर उभारण्याचा विचार मांडला होता असे शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून म्हणाले. त्याला उत्तर देतांना बावनकुळेंनी एक एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, राजीव गांधी यांच्या निधनानंतर २० वर्षांहून अधिक काळ केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून सत्ता उपभोगत होते. तरीही राजीव गांधींचे स्वप्ने का पूर्ण करू शकले नाही?, असा सवाल त्यांनी केला.
मग, उद्घाटनाला येणे का टाळता?
बावनकुळे म्हणाले, राजीव गांधींच्या या स्वप्नाचा त्यांना विसर पडला असला, तरी तुम्हीही आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी म्हणून सरकारचा महत्त्वाचा भाग होतात, मग तुम्ही त्यांची आठवण का करून दिली नाही? आणि हो, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कोर्टात भगवान श्रीराम यांना काल्पनिक म्हटले होते, राम सेतूचे पुरावे मागितले होते. नाही नाही ती दुषणे रामभक्तांवर लावली, तेव्हा तुम्ही राजीव गांधींचे हे विधान त्या नेत्यांपर्यंत का पोहोचवले नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती पवारांवर केली.
इंडिया आघाडीकडून उत्सवाचे राजकारण
आता जेव्हा हे राजीव गांधींचे स्वप्न होते असे म्हणता, तर मग सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष तसेच इंडिया आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तुम्ही स्वतःही या कार्यक्रमाला येण्यास का टाळता? असा सवालही बावनकुळेंनी केला. जनता पाहत आहे, आणि देवही पाहतो आहे की, त्यांचा वनवास संपत असताना या उत्सवात तुम्ही लोक कसे राजकारण करत आहात. पवार साहेब, जनतेला सर्व माहित आहे. ऐ बाबू ऐ पब्लिक है, सब जानती है…. तुम्ही कितीही ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही लोकांना सर्वच माहिती आहे, असं बावनकुळे म्हणाले.