‘बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच’; चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावूनच सांगितलं

‘बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच’; चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावूनच सांगितलं

Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष कामाला लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच आता महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जिंकून येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंकडून (Chandrashekhar Bawankule) करण्यात आला आहे. तसेच बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचंही बावनकुळेंनी ठणकावून सांगितलं आहे.

Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! चौहान-सिंधियांचे खास नेते मंत्रिमंडळातून बाहेर…

बारामती जागा आम्ही लढवणार असल्याचा दावा अजितदादांकडून करण्यात आला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बारामती लोकसभेतून अजितदादा लढले काय आम्ही लढलो काय सारखंच आहे. बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार असून बारामतीची जागा महायुतीचा उमेदवार 51 टक्के मते घेऊन जिंकणार आहे. बारामतीतून जो उमेदवार ठरेल तो 51 टक्के मते घेऊन जिंकणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे.

तसेच महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, अशी स्थिती होणार आहे. अनेक उमेदवार महाविकास आघाडी सोडून जातील. जागावाटपाबाबत महायुतीमध्ये राज्याचे तिन्ही नेते आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील. महायुतीतील घटक पक्षांनी जागेची मागणी करणं चुकीचं नाहीये. शेवटी प्रत्येक जागा आम्हाला जिंकायचीयं. महायुतीला जिंकण्यासाठी लढायचं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असा आमचा फॉर्मुला असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?

राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हाही एक्झिट पोल आले होते. मात्र, खरी वस्तुस्थिती काय आहे? देशातील मध्यमवर्गीय लोकं पंतप्रधान मोदींसोबत आहेत. मोदींच्या नेतृत्वात महायुती राज्यात 45 जागा जिंकणार असून या तोंडाच्या वाफा नाहीत. काहींना तोंड्याच्या वापा सोडायची सवय लागली असल्याची खरमरीत टीकाही बावनकुळेंनी यावेळी केली आहे.

जागांबाबत तिन्ही नेते अन् वरिष्ठ नेते निर्णय घेतील :
महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाहीत अशी स्थिती होणार आहे. जागावाटपाबाबत राज्यातील तिन्ही घटक पक्षाचे नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाही जिंकून येणं महत्वाचं असून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचा विश्वास बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केलायं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube