IND vs AFG : रोहितचे तुफानी शतक, रिंकूची धुवांधार फिफ्टी; अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर

IND vs AFG : रोहितचे तुफानी शतक, रिंकूची धुवांधार फिफ्टी; अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर

IND vs AFG : टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी जबरदस्त खेळी केली. रोहित आणि रिंकूमध्ये 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी झाली. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने अवघ्या 39 चेंडूत 69 धावा केल्या. रिंकूने त्याच्या इनिंगमध्ये 2 चौकार आणि 6 षटकार मारले. एकवेळ 22 धावांवर चार विकेट पडूनही टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. भारतीय संघाने शेवटच्या पाच षटकात 100 हून अधिक धावा केल्या.

रोहित शर्मा तिसर्‍या T20 मध्ये 121 धावांची तुफानी इनिंग खेळला. रोहितच्या T20 कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. रोहितने फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला. याशिवाय, रिंकूने धुवांधार 69 धावा केल्या. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 212 धावा केल्या.

दावोस दौऱ्यातून CM एकनाथ शिंदेंचं गुंतवणूकदारांना साकडं, म्हणाले, ‘भारताच्या विकासगाथेत….’

भारताची 4.3 षटकांत 4 विकेट गमावून 22 अशी अवस्था होती. पण त्यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंगच्या साथीने डावाची धुरा सांभाळली. डावाच्या शेवटच्या षटकात रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने मिळून 36 धावा केल्या. रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर षटकारांची हॅट्ट्रिक साधली. 25 धावांवर 4 विकेट पडल्यानंतर भारताने T20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम केला. रोहित-रिंकूपूर्वी टीम इंडियाने यशस्वी जैस्वाल (04), विराट कोहली (00), शिवम दुबे (01) आणि संजू सॅमसन (00) यांच्या रूपाने चार विकेट गमावल्या होत्या.

अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याने 4 षटकात 20 धावा दिल्या. याशिवाय अजमतुल्ला उमरझाईने 1 विकेट घेतली. त्याने 4 षटकात 33 धावा दिल्या. इतर एकाही अफगाण गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.
…म्हणून सरकारमध्ये बसलेल्यांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे; रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज